महाराष्ट्र

देशात आजपासून ४ नव्या श्रम संहिता लागु

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी देशात ४ नव्या श्रम संहिता ( लेबर कोड) लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या ४ श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये ‘द कोड ऑन वेजेस’ २०१९, ‘द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड’ २०२०, ‘द कोड ऑन सोशल सिक्युरिटी’ २०२० आणि ‘द ऑक्युपेशनल सेफ्टी’, ‘हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड’ २०२० याचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या २९ कायद्यांमध्ये सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत. नव्या लेबर कोडमुळं आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी होईल, असं सांगण्यात आलेआहे.

केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांच्या पोस्टनुसार ,सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, ४० कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. ४० वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना १०० टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल.” असं मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मनसूख मांडवीय पुढं म्हणाले ,” “हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत २०४७ चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल.” असे मनसूख मांडवीय म्हणाले.

भारतातील अनेक कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच १९३० ते १९५० च्या काळातील आहेत. अर्थव्यवस्था आणि जग बदललं आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था अपडेट झाल्या असून त्यांनी अलीकडच्या दशकात लेबर रेग्युलेशन्स केल्या आहेत. भारतात तुटक, किचकट, कालबाह्य तरतुदी असणारे २९ केंद्रीय कायदे होते. नव्या ४ लेबर कोडची अंमलबजावणी आधुनिक जागतिक ट्रेंडसशी जोडून घेणार आहेत. या नव्या कोडमुळं कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं सांगण्यात आलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago