महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे पुत्र आणि खासदार Shrikant Shinde यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर-राणे यांनी पक्षाच्या महिला जिल्हा संघटक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. वाशीतील घडामोडीनंतर आता कल्याणमध्येही पक्षाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वैशाली दरेकर-राणे यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्याकडे पाठवला आहे. गेल्या महिन्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यानंतर आता वैशाली दरेकर-राणे यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

दरम्यान, वैशाली दरेकर-राणे पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्क-वितर्क सुरू असले, तरी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्ष सोडण्यामागे केवळ वैयक्तिक कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, “मी महिला जिल्हा संघटक या पदावर गेली दोन वर्षे कार्यरत आहे. मात्र सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे या पदाला आवश्यक तो न्याय आणि वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे महिला जिल्हा संघटक पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देत असून, तो स्वीकारावा ही विनंती.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago