महाराष्ट्र

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नागपुरात नवा वाद निर्माण झाला आहे. “सावजी जेवण माझ्यासारख्या माणसाने खाल्ले तर किमान महिना भर रुग्णालयात जावे लागेल” तसेच “अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो” असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यावर सावजी हॉटेल चालक आणि सावजी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नागपुरातील सावजी हॉटेल चालकांचे म्हणणे आहे की, सावजी हा केवळ खाद्यपदार्थ नसून नागपूरची ओळख आणि परंपरा आहे. शहरात सुमारे हजार सावजी भोजनालये असून दररोज हजारो नागरिक येथे जेवतात. “सावजी आरोग्यासाठी घातक असते, तर नागपुरातील रुग्णालये रुग्णांनी भरली असती,” असा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.

काही हॉटेल चालकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर प्रसिद्धीसाठी अशी विधाने केल्याचा आरोप करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांनी मुंढेंना मूळ पारंपरिक पद्धतीने तयार केलेले सावजी जेवण चाखण्याचेही निमंत्रण दिले आहे.

दरम्यान, सावजी समाजाने मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सावजी ब्रँड आणि या व्यवसायाशी संबंधित समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे.

दुसरीकडे, काही जणांनी मुंढे यांच्या निरीक्षणात काही तथ्य असल्याचेही म्हटले आहे. सावजीच्या नावाखाली अनेक ठिकाणी अतिप्रमाणात तेल आणि तिखट वापरले जात असल्याने मूळ चव आणि गुणवत्ता बिघडत असल्याची टीका केली जात आहे.

आहारतज्ज्ञ स्नेहा झावर यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सावजी मसाल्यातील मसाले आरोग्यासाठी लाभदायक असले तरी तेलाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने तयार केलेले सावजी पदार्थ आरोग्यदायी ठरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

सावजी खाद्यसंस्कृती ही मध्य भारतातील हलबा-कोष्टी समाजाची पारंपरिक देणगी मानली जाते. खास मसाला, भाजण्याची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे सावजी मटण, चिकन, खिमा, कलेजी, तर्री पोहे आणि अनेक शाकाहारी पदार्थांना देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago