महाराष्ट्र

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25 बदल्या झाल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र, बदलीच्या बाबतीत कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची कारकीर्द त्याहूनही अधिक चर्चेत आहे. त्यांच्या सुमारे 20 वर्षांच्या सेवेत तब्बल 40 वेळा बदली झाल्याचे सांगितले जाते.

डी. रूपा मौदगिल यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 43 मिळवत परीक्षा उत्तीर्ण केली. उच्च रँक मिळूनही त्यांनी भारतीय पोलीस सेवेची निवड केली. हैदराबाद येथील पोलीस अकादमीत प्रशिक्षणादरम्यानही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाचवा क्रमांक मिळवला.

उमा भारतींना अटक करून मिळवली राष्ट्रीय ओळख

डी. रूपा यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली घटना म्हणजे मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्याविरोधातील कारवाई. हुबळी येथील एका प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी उमा भारती यांच्यावर अटकेची कारवाई केली. एका प्रभावशाली राजकीय नेत्याविरोधात कठोर भूमिका घेतल्याने त्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या.

शशिकला प्रकरणानेही उडाली खळबळ

बंगळुरू कारागृहात DIG म्हणून कार्यरत असताना डी. रूपा यांनी AIADMK नेत्या व्ही. के. शशिकला यांना तुरुंगात कथितरीत्या मिळणाऱ्या विशेष सुविधांचा मुद्दा उपस्थित केला होता. कारागृहातील कथित गैरप्रकार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली. याशिवाय त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई केली.

20 वर्षांत 40 बदल्या, तरीही तत्त्वांशी तडजोड नाही

कडक कार्यपद्धती आणि राजकीय दबावाला न जुमानण्याची भूमिका यामुळे डी. रूपा यांना वारंवार बदल्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले जाते. कर्नाटकसह विविध ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. वारंवार बदली होऊनही आपल्या कामाची शैली आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली.

बदली ही शासकीय सेवेचा भाग आहे; मात्र ज्या ठिकाणी नियुक्ती मिळेल, तिथे प्रामाणिकपणे काम करणे हेच आपले कर्तव्य आहे, असा संदेश त्यांच्या कारकिर्दीतून अधोरेखित होतो. त्यामुळेच डी. रूपा मौदगिल यांचे नाव देशातील धडाकेबाज आणि कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये घेतले जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

21 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago