महाराष्ट्र

घरकुलसाठी आता मिळणार ५०,००० रुपये जास्तीचे अनुदान, एकूण अनुदान २.०९ लाख रुपयांवर

औरंगाबाद: गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण २ लाख ९ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये १५,००० रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.

आता कोणकोणते लाभ मिळणार

PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000 मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000

नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000

एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000

हा निर्णय का घेण्यात आला 

सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर केले आहे.

कोण लाभ घेऊ शकतो

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी

राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थी

अपूर्ण घरकुल बांधणारे लाभार्थी

नवीन पात्र अर्जदार

सौर ऊर्जा यंत्रणेचा समावेश

घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वाळूचा प्रश्न कधी सुटणार

घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.

घाई करा, अंतिम मुदत जवळ आली आहे

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत १० एप्रिल २०२५ पर्यंत १.६० लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तुमचेही घर यामध्ये असावे, यासाठी त्वरित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामविकास कार्यालयाशी संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago