महाराष्ट्र

विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा आपले सरकार पोर्टलवर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देणेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.विद्यापीठाशी संबंधित ऑनलाईन सेवा बाबत सादरीकरण अनुप बाणाईत यांनी केले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर राईट टू सर्विस(RTS)या टॅब खाली आवश्यक माहिती प्रदर्शित करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाने डॅशबोर्ड वर आलेल्या अर्जाची पडताळणी करून या सेवा विहित मुदतीत विद्यार्थ्यांना मिळावी या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देशही मंत्री श्री पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत 56 सेवा ऑनलाईन करण्यात आले असून 20 सेवा या विद्यापीठाशी संबंधित आहेत.या सेवा राज्यातील जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार आहेत.

प्रत्येक महाविद्यालयामध्ये याकामी एका कायदेशीर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात करण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आपले सरकार संकेतस्थळावर सर्व विद्यापीठाचा डेटा एका ठिकाणी दिसेल यामध्ये अर्ज किती आले आहेत, किती अर्ज प्रलंबित आहेत, व किती अर्जावर कार्यवाही झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिसणार आहे.याबाबत विद्यापीठा अंतर्गत अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कुलगुरूंनी प्रत्येक आठवढ्याल याचा आढावा घेणे आवश्यक आहे. कुलगुरूंनी सर्व सेवांवर काम करताना काळजीपूर्वक काम करावे .याचा वेळोवेळी आढावा घेण्यात याव.सर्व विद्यापीठाने या सेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. प्रत्येक विद्यापीठाने व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. फेक ,बोगस प्रमाणपत्र वर आळा घालण्यासाठी विद्यापीठाने ब्लॉक चेन सेवा लवकरात लवकर सुरू करावी. यापुढे कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा विद्यापीठामार्फत देण्यात येणार आहेत त्याची माहिती एसएमएसद्वारे विद्यापीठाने कळवावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago