महाराष्ट्र

महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली

मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अमोल ,राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांना समाजाभिमुख कार्यात सहभागी करून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावता येते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मानवता, सहकार्य, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, साक्षरता मोहिमा, रक्तदान शिबिरे यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना समाजाशी थेट जोडणारी आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवणारी प्रभावी योजना आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याने यात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago