महाराष्ट्र

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २७३ विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाला आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमधील ३६४, तर अनुदानित आश्रमशाळांमधील २०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजारांसह अपघात, आत्महत्या आणि सर्पदंशाचाही समावेश आहे.

गंभीर आजारामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सरकारी आश्रमशाळांतील १८२, तर अनुदानित आश्रमशाळांतील ९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानंतर अपघाती मृत्यूचे प्रमाण असून, सरकारी आश्रमशाळांमधील १५५, तर अनुदानित आश्रमशाळांमधील ७३ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. आता दोन वर्षांतील ५८४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची आकडेवारी समोर आल्याने आश्रमशाळांमधील आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चिंता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, सरकारी आश्रमशाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशा आरोग्य सुविधा, सुरक्षित निवास व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

21 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

23 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago