महाराष्ट्र

व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात मधील बसपोर्ट…

गांधीनगर: बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले “बसपोर्ट” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ केला आहे. असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विवेक भीमनवार, श्री.नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री .नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) श्री . दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत.

या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री श्री . हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली . या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली ( command control system) अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ” प्रवासी विश्रांतीगृह ” कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली.

सन्माननीय पंतप्रधान श्री. ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती . इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का! याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

(अभिजीत भोसले)

जनसंपर्क अधिकारी 

मा.मंत्री, परिवहन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

7 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

8 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

12 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

12 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

12 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

12 तास ago