महाराष्ट्र

आदमापूर येथील संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात धडकी भरवणारी भाकणूक

तिसऱ्या महायुद्धासह मोठ्या संकटांचा इशारा

आदमापूर: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या उत्सवासाठी राज्यासह पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेतील पारंपरिक भाकणूक ऐकण्यासाठी भाविक पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्षीच्या यात्रेत कृष्णात डोणे महाराज यांनी भाकणूक केली. पहाटे चार वाजता सुरू झालेला भाकणुकीचा सोहळा सकाळी सहा वाजेपर्यंत चालला. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने भाविकांचे विशेष लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते.

भाकणुकीमध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा देण्यात आला. जगातील इस्लामिक राष्ट्रांमध्ये संघर्ष पेटेल, भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होईल, तसेच चीन भारतावर आक्रमण करू शकतो, असेही सांगण्यात आले. या युद्धांमुळे मोठे नुकसान होईल आणि जगभर अस्थिरता निर्माण होईल, अशी भाकणूक करण्यात आली.

देशांतर्गत परिस्थितीबाबतही अनेक संकेत देण्यात आले. देशात महागाई वाढेल, राजकारणात मोठा गोंधळ उडेल आणि अनेक नेते मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये अडकून तुरुंगात जातील, असे सांगण्यात आले. तसेच साखर कारखान्यांचे व्यवस्थापक सुखात राहतील, छोटे पक्ष राज्याच्या राजकारणात प्रभावी होतील आणि कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होईल, असेही भाकीत करण्यात आले.

याशिवाय कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, नैसर्गिक आपत्ती वाढतील, भूकंप व वादळे होऊन मोठे नुकसान होईल, अशीही भाकणूक करण्यात आली. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल, तसेच रेल्वे, विमाने आणि मोठ्या वाहनांचे अपघात वाढतील, असेही सांगण्यात आले.

भविष्यात सामाजिक स्थितीतही बदल होण्याचे संकेत देत तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागेल, मानवी आयुष्य कमी होईल, विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल, असेही भाकीत करण्यात आले. तसेच हिंदू धर्माला चांगले दिवस येतील आणि जगातील अनेक देशांमध्ये हिंदू धर्माची स्थापना होईल, असेही भाकणुकीत सांगण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यंदाची भाकणूकही ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक वर्षांपासून या यात्रेत होणाऱ्या भाकणुकीकडे भाविकांचे विशेष लक्ष लागलेले असते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

13 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

20 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

20 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

2 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

3 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago