औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली.
असा घडला थरार
शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते.
रात्री सुमारे ८ वाजता घरी परतत असताना अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले.
मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवरून मुलाला फोन आला.
“वडिलांचे अपहरण केले आहे, १ कोटी रुपये तयार ठेवा” अशी धमकी देण्यात आली.
घाबरलेल्या मुलाने तत्काळ अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांची धावपळ, पण दुर्दैव…
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केले.
रविवारी दिवसभर आणि रात्रभर विविध पथके शोधासाठी रवाना करण्यात आली.
मुलाने खंडणी देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नराधमांनी तुकाराम गव्हाणे यांची हत्या केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून देण्यात आला.
ताब्यात घेतलेले पाच आरोपी कुठल्या भागातील?
गोळेगाव येथील २ आरोपी
पालोदवाडी येथील २ आरोपी
पानवडोद येथील १ आरोपी
सर्व आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती
ही घटना केवळ एका कुटुंबावर नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजावर झालेला घाला आहेmदोषींना कठोर शिक्षा मिळावी, हीच सर्वांची मागणी आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…