पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची तोडफोड देखील केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांची पळापळ झाली, तर अनेकांनी आपल्या जीवाची धास्ती अनुभवली.
हुल्लडबाजीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काही नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मगरपट्टा सिटी हा पुण्यातील महत्त्वाचा IT हब मानला जातो, त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीती पसरली आहे.
पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेऊन आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे. परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू असून, नागरिकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस Patrol वाढवण्याची मागणी केली आहे.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…