मुंबई: मराठमोळा रिल स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रथमेश गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, आणि आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावरून ही दु:खद बातमी सर्वांना दिली आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रथमेश कदम आणि त्यांची आई प्रज्ञा कदम यांचे सोशल मीडियावरील रिल्स नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस उतरत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यानंतर प्रथमेशवर संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आली होती. त्यांनी आपल्या कर्तव्यातील जबाबदारी पार पाडली आणि आपल्या आईला धीर दिला. त्यांच्या व्हिडिओंमध्ये साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि नृत्याची कला यामुळे अनेक चाहत्यांचे हृदय जिंकलं.
प्रथमेशच्या मित्र तन्मय पाटेकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी. Miss You Bhai.”
अत्यंत अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या प्रथमेशच्या निधनामुळे त्यांच्या आईवर दु:खाची सावली पडली आहे. मित्र, कुटुंब आणि चाहत्यांनी या कठीण प्रसंगात प्रथमेशच्या आईच्या दुःखात सहभागी होऊन साथ दिली आहे. प्रथमेशच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…