लग्नाचे आमिष दाखवून 40 हजारांची फसवणूक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश): एका 22 वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे उघडकीस आली आहे. नात्यातीलच मावस भाऊ आणि त्याच्या मित्राने या दोघींवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.
पीडित महिलेचा पती कामानिमित्त गुजरातमध्ये राहत असल्याने, लहान मुलीची देखभाल करण्यासाठी तिने आपल्या अल्पवयीन बहिणीला घरी बोलावले होते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींनी दोघींना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.
जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार
दोन्ही बहिणी मंदिरातून परतत असताना अंधार झाल्याने मावस भावाने आणि अमन खान नावाच्या त्याच्या मित्राने त्यांना घरी सोडतो, असे सांगितले. रात्री उशीर झाल्याचे कारण पुढे करत आरोपी पीडितेच्या घरीच थांबले. रात्रीच्या वेळी दोघांनीही जीवे मारण्याची धमकी देत पीडितांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मावस भावाने यापूर्वीही पीडित विवाहित महिलेसोबत अत्याचार केला होता. मात्र भीतीपोटी तिने त्यावेळी कोणाकडेही तक्रार केली नव्हती.
लग्नाचे आमिष आणि आर्थिक फसवणूक
अत्याचारानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी दोघींना लग्नाचे आमिष दाखवत सोबत नेले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवास व राहण्यास पैसे नसल्याचे नाटक करत मावस भावाने पीडितेकडून 40 हजार रुपये रोख आणि चांदीचे जोडवे घेतले. त्यानंतर दोघींनाही स्टेशनवरच सोडून आरोपी पसार झाले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने मावशीकडे चौकशी केली, मात्र आरोपी तिथेही आढळून आला नाही.
अखेर पोलिसांत तक्रार
पीडित महिला माहेरी परतल्यानंतर तिला तिथेच आरोपी मावस भाऊ दिसला. पैशांची मागणी केल्यावर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अखेर धैर्य एकवटून पीडितेने संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती एसडीओपी मनीष यादव यांनी दिली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…