महाराष्ट्र

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे: ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीतील पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्री नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा आढावा, एनआयआरएफ, एसआयआरएफ, महाज्ञानदीप, पीएम उषाच्या धर्तीवर सीएम उषा यांसह उच्च व तंत्रशिक्षण विभागासोरील आव्हाने आणि उपाययोजना याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर उच्च स्तरीय कार्यशाळा आज पुण्यात संपन्न झाली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, इन्फ्लिबनेट (INFLIBNET) गांधीनगरच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विविध विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, मंत्रालयीन सहसचिव/ उपसचिव, अवर सचिव, कक्षाधिकारी, विद्यापीठांचे कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व विभागीय सहसंचालक, विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कार्यशाळेचा उद्देश विकसित भारत आणि महाराष्ट्रसाठी विद्यापीठांची भूमिका आणि योगदान अधोरेखित करून देणे हा होता.उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गेल्या वर्षात विकसित केलेल्या महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून विद्यापीठांच्या पुढील वाटचालीची दिशा कशी असेल यावर चर्चा झाली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

परिषदेच्या सुरुवातीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्रीबाबत उपस्थित सर्व विद्यापीठांचे कुलगुरु आणि प्राध्यापक यांना माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ह्यूमन कॅपिटल डेव्हलपमेंट आणि उच्च शिक्षणाचे ज्ञान आधारित अर्थशास्त्रा यावर मार्गदर्शन केले. तसेच, नव्या शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरेला देण्यात आलेल्या महत्वाबाबतही विषद केले.

त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याबाबत विस्तृत विवेचन मांडले. तर नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमधील काही आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. इंडस्ट्री आणि विद्यापीठांची फुटप्रिंट वाढवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली

दुपारच्या सत्रात एनआयआरएफ, एसआयआरएफ, महासार्क, महादीप, पीएम उषाच्या धर्तीवर सीएम उषा याबाबत सीओईपीचे कुलगुरु प्रा. डॉ. सुनील भिरुड, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनी सादरीकरण केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नव्या डॅशबोर्ड बाबत ई ॲंड यूच्या टीमने सादरीकरण केले. दिवसभरच्या या कार्यशाळेत उच्च शिक्षण विभागातील बदल, विभागासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांवर व्यापक उहापोह झाला. कार्यशाळेचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ पराग काळकर यांनी केले. तर मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी कार्यशाळेत सहभागी सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग (MHTED) आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर (INFLIBNET) यांच्यात सामंजस्य करार (MoU) माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री — उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली (SIRF) व राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली (SHEDMS) या एकात्मिक वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता व डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे.हा करार महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांसाठी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेदरम्यान, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी, पुणे येथे संपन्न झाला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, इन्फ्लिबनेट (INFLIBNET) च्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विविध विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

4 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

5 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

5 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

10 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

10 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

10 तास ago