महाराष्ट्र

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट शिर्डी साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले आहे. वाहन उद्योगात नवीन मॉडेलच्या यशस्वी प्रवासासाठी पहिले वाहन देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डिलर्सनी एकत्र येत २५ लाख ७० हजार रुपये किंमतीची अत्याधुनिक टाटा सिएरा कार संस्थानला प्रदान केली.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या परिसरात हा हस्तांतरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील विविध डिलर्सच्या उपस्थितीत वाहनाचे विधीवत शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. मंत्रोच्चारांच्या घोषात गाडीला हार घालून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पूजेनंतर डिलर्सच्या वतीने गाडीची चावी अधिकृतपणे संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्सच्या सर्व डिलर्सचा शाल, श्रीफळ व साईबाबांची मूर्ती देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले की, “टाटा मोटर्सने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही नवीन कार संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी, पाहुण्यांच्या सुविधेसाठी तसेच सेवाभावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”

दरम्यान, टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “साईबाबांच्या आशीर्वादाने आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात व्हावी, या श्रद्धेने आम्ही हे वाहन साईचरणी अर्पण केले आहे.”टाटा मोटर्सच्या या उपक्रमाचे भाविकांसह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago