मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ३० जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…