महाराष्ट्र

वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया: काही जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते आता डोकी फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र शोले सिनेमातील असरानीप्रमाणे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अशी भाषा करु नये. आव्हान देण्यासाठी मनगटात ताकदं असावी लागते. वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. ते लोकसभेत हरले, विधानसभेत हरले आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही त्यंचा पराभव होणार, असे शिंदे म्हणाले. विदर्भातील देवरी, गोंदिया येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सहसराम करोटे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर मंत्री संजय राठोड, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांची महालाट आली आणि त्यात भलेभले वाहून गेले. काहीजण म्हणाले होते, तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. पण विधानसभेतील भाषणात २०० हून अधिक जागा निवडून आणू, अशी मी घोषणा केली होती. निवडणुकीत मी आणि देंवेंद्र फडणवीस यांनी मिळून महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. मागील अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर काम केले. विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना सुरु केल्या. अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीने बंद केलेल्या सर्व योजना सुरु केल्या, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री असताना ३५०० ते ४००० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला, असे ते म्हणाले. नरेंद्र भोंडेकर आणि त्यांची टीम मिळून आपल्याला विदर्भासाठी काम करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की सत्ता येते आणि जाते, पदं येतात आणि जातात, पुन्हा पदं मिळतात, मात्र लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राला समर्पित काम करेन, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. मी पदासाठी आणि खुर्चीसाठी कदापी कासावीस झालो नाही आणि होणार नाही. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला काय मिळाल हे पाहणारा मी आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. लोक शिवसेनेत येत आहे कारण हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेअर मार्केटमध्ये जसा गुंतवणूकदारांचा विश्वासावर चालते तसे शिवसेनेचे आहे. तुमचा विश्वास कदापी तुटू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.

मी सगळ्या धमक्यांना पुरुन उरणारा आणि पाठिशी उभा राहणारा आहे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मी बाळसाहेब आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. आनंद दिघे असताना डान्स बार, लेडिज बार बंद केले होते. त्यावेळीही अनेक धमक्या आल्या होत्या. गडचिरोलीचा पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या मात्र त्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठवण्याचे काम गडचिरोलीच्या पोलीसांनी केले. त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे शिंदे म्हणाले. मी धमक्यांना घाबरणारा नाही तर पुरुन उरणारा आहे, असा पुनरुच्चार शिंदे यांनी यावेळी केला. कोविड काळात पीपीई कीट घालून रुग्णांना आणि डॉक्टरांना दिलासा दिला. जोवर ही जनता पाठिशी हा तोवर जीवाला सोडा दाढीच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

4 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

9 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

9 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

9 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

9 तास ago