महाराष्ट्र

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे तसेच रूसा आणि पीएम उषा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देऊन ते निर्धारित कालावधीत पूर्ण करावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण परिषदेची (SHEC) आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रूसा, पीएम उषा तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकल्प, देयके आणि अपूर्ण कामांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

रूसा-२ अंतर्गत संथ गतीने सुरू असलेल्या प्रकल्पांवर बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (रायगड) आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्रकल्पांना मुदतवाढ मिळण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून निधीचा प्रभावी वापर करावा, तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत सुरू असलेली कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, रूसा प्रकल्प संचालक बी. एन. पाटील, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago