मुंबई: संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली.
तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. तसेच औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…