महाराष्ट्र

दहावी-बारावी व CET निकाल लागूनही अद्याप प्रवेश सुरू नाही

राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा

मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे.

राज्यात सध्या 13 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत आहेत. CET सेलने मार्च–एप्रिल महिन्यात तब्बल 18 हून अधिक प्रवेश परीक्षा पार पाडल्या. त्यांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच लागले. मात्र अजूनही त्या निकालांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी करण्यात आलेला नाही.

दहावी परीक्षेत यंदा 15 लाख 33 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, परंतु अकरावी प्रवेशासाठी फक्त 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आता फक्त पहिली फेरी संपल्यानंतर अर्ज करण्याची परवानगी आहे.त्यामुळे या लाखो विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक महिना वाया गेला असून त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे फक्त शैक्षणिक गोंधळ नाही. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शिक्षण खात्यावर थेट व शेलक्या शब्दांत प्रहार करत राज्य शासनाच्या गलथान नियोजनावर संताप व्यक्त केला आहे. निकाल लागल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सुरु होत नसेल, तर हा निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याची घोर हेळसांड आहे,” असे ते म्हणाले.

प्रशासनाला इशारा अन्यथा आंदोलन

शासनाने तातडीने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या आणि प्रभावी पद्धतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशाराही ॲड. मातेले यांनी दिला आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. आणि या हक्काशी खेळल्यास, आम्ही रस्त्यावर उतरण्यापासून माघार घेणार नाही!” अशा शब्दांत त्यांनी शासनाला सावध केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago