महाराष्ट्र

हिंदी भाषा सक्तीच्या या एकांगी निर्णयाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा विरोध

पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक

रत्नागिरी: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारिरीक आणि बौद्धीक क्षमतेचा विचार करता पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक वाटते. बालवयातील मुलांची मानसिकता लक्षात घेता, राज्यातील अनेक नामवंतांनी, शिक्षणतज्ञांनी जाहीरपणे इतक्या लहान वयात तिसऱ्या भाषेचे अध्ययन हे वर्तमान पिढीला झेपणारे नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारने घेतलेल्या भाषा सक्तीच्या या निर्णयाला एकांगी मानून कोकण मराठी साहित्य परिषदेचा विरोध दर्शविला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर व कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

8 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

8 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

8 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

9 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

9 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

23 तास ago