महाराष्ट्र

अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळाबाबत शिक्षणमंत्र्यांना ॲड. अमोल मातेले यांचे निवेदन

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी, प्रशासनाची ढिसाळ तयारी आणि परिणामी विद्यार्थ्यांना व पालकांना भेडसावणाऱ्या मानसिक त्रासाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना सविस्तर निवेदन ईमेलद्वारे पाठवले आहे.

७ जून २०२५ पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, पहिल्याच दिवशीच वेबसाईटवरील तांत्रिक बिघाडामुळे अनेक विद्यार्थी अर्ज सादर करू शकले नाहीत. परिणामी गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या वेळापत्रकात गोंधळ निर्माण झाला. या प्रक्रियेमध्ये बारकाईने पूर्वतयारी नसल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे, ‘लाडके विद्यार्थी योजना’ लागू करण्यासंबंधीची मागणी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. या योजनेच्या अभावामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याचा खर्च झेपत नाही, यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर ॲड. मातेले यांनी सरकारकडे खालील मागण्या ठेवल्या आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः मोफत करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा अर्ज करताना होणारा आर्थिक भार कमी होईल. ‘लाडके विद्यार्थी योजना’ तातडीने लागू करावी, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक आधार मिळेल. स्वतंत्र तांत्रिक पथकाची नियुक्ती करावी, जे वेळीच अडचणी सोडवेल व पालक-विद्यार्थ्यांना समुपदेशन करेल. शिक्षण संचालनालयाच्या गलथान कारभाराबाबत जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करून पुढील सुधारणा कराव्यात, जेणेकरून अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण होईल.

अकरावी प्रवेश ही केवळ एक प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वळण निश्चित करणारी बाब आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुधारणा कराव्यात, ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाची स्पष्ट भूमिका आहे.

ॲड. अमोल मातेले

मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

18 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

18 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

18 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago