महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के इतकी आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने राज्याच्या स्थापनेपासून या घटकांना शिक्षण व नोकरीत आरक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र आजही कडकलक्ष्मी, वैदू, गोंधळी, जोशी, वासुदेव, बहुरूपी, भराडी, डोंबारी, टकारी, रामोशी, लमाण यांसारख्या सुमारे ४० जमाती पारंपरिक भटकंती आणि व्यवसायामुळे संघटित स्वरूपात मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत.

या विखुरलेल्या आणि वंचित समाजघटकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेसने व्यक्त केला आहे. विभागाला अधिक बळकटी देण्यासाठी स्वतंत्र ‘विभाग’ स्थापन करून त्याची जबाबदारी ॲड. पल्लवी रेणके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्रश्नांना संघटित आणि प्रभावीपणे हाताळले जाईल, असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

19 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

22 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

22 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago