महाराष्ट्र

तंत्रज्ञान-उद्योग सहकार्याला नवी गती; महाराष्ट्र-वाकायामा संबंध अधिक दृढ होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानमधील वाकायामा प्रांत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी तसेच शासन, उद्योग, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

2013 च्या कराराचे 2023 मध्ये नूतनीकरण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता. 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक देवाण-घेवाण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरात आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

कोयासन विद्यापीठात डॉ. आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

जपान दौऱ्यादरम्यान कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोयासन विद्यापीठ येथे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याचा उल्लेख केला. हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

क्रीडा क्षेत्रातील देवाण-घेवाण

2023 मध्ये वाकायामाचे दिवंगत राज्यपाल यांच्या उपस्थितीत सुमो खेळाडूंचा संघ मुंबईत आला होता. गेटवे ऑफ इंडिया येथे सुमो आणि भारतीय कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. सध्या जपानी सुमो खेळाडू बालेवाडी क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण घेत आहेत. या देवाण-घेवाणीमुळे दोन्ही देशांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांमध्ये जपानची भूमिका

जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंध अधिक दृढ झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उल्लेख केला. तसेच मुंबईतील 40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो आणि 22 किमी लांबीचा देशातील सर्वात मोठा समुद्री पूल उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये बामियान बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती

अफगाणिस्तानातील बामियान येथील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेले ऐतिहासिक ठिकाण म्हणून नागपूरची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून जागतिक शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्री अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

2028 मध्ये कराराचे पुन्हा नूतनीकरण

राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी 2028 मध्ये कराराचे पुन्हा नूतनीकरण करून नव्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस व्यक्त केला. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगत दोन्ही राज्यांतील संबंध नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाणे येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) च्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमातून उद्योग आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच नागपूर येथे बामियान बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील चर्चेसाठी तयारी दर्शवली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

49 मिनिटे ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

58 मिनिटे ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

1 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

1 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

1 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

1 तास ago