महाराष्ट्र

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युतीधर्माला हरताळ फासत मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली.

सरवणकर म्हणाले की, “माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी चार-पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. मतदार माझ्यासोबत होते, मात्र भाजपच्या स्थानिक यंत्रणेने जाणीवपूर्वक मदत रोखली.”

भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे सरवणकरांना मदत करू नये, असे स्पष्ट आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला. वरून आदेश आल्याचा भास निर्माण करून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

हा प्रकार केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून लोकसभा निवडणुकीपासूनच अशीच टोळी सक्रिय असल्याचा दावा सरवणकर यांनी केला. लोकसभेत शीतल गंभीर यांच्या पराभवासाठीही हीच यंत्रणा कार्यरत होती, मात्र तरीही त्यांचा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.

दादर-माहीम परिसरातील निकालांवरून जनता कोणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होते, असे सांगत सरवणकर यांनी भाजपने युतीधर्म पाळला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला लगावला.

या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे घेऊन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या तक्रारीनंतर भाजप त्या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

6 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago