मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. जरी संख्याबळाच्या दृष्टीने हे कठीण वाटत असले, तरी ते अशक्य मुळीच नाही. भाजपसोबत मनभेद मागे ठेवून जुळवून घेतल्यास भाजपकडूनही सकारात्मक पाऊल टाकले जाऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. ‘देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा (उबाठा) महापौर नक्कीच होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नैसर्गिक युतीकडे म्हणजेच भाजपकडे पाहिले पाहिजे. शिवसेना–भाजप ही नैसर्गिक युती पुन्हा एकदा महाराष्ट्रवासियांना पाहायला मिळावी, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना फोडून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांच्या बळावर अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौरपद मिळावे, असा आग्रह धरल्याचे समोर आले आहे. मात्र, गेल्या काही काळात भाजप आणि शिंदे गटातील वाढलेले अंतर, तसेच निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेविरोधात केलेला प्रचार लक्षात घेता, शिंदे गटाला बाजूला सारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा हेमंत पाटील यांनी केला.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…