महाराष्ट्र

अलकाताई खांडरे ‘विकासाच्या लढतीला नवी चालना’

महाविकास आघाडीचे पक्के पाऊल, जनतेचा प्रचंड प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताई सुरेश खांडरे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिरूरच्या राजकारणात सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये “अनुभवी नेतृत्व पुन्हा मिळणार” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.अलकाताई खांडरे यांनी दोन कार्यकाळ नगरसेविका आणि दोन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना शिरूर शहरातील नागरी सोयीसुविधांना नवा चेहरा दिला.

रस्ते-विस्तारीकरण, डांबरीकरण, उद्याने विकास, शहरसुशोभीकरण, स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन, बसस्थानक परिसर विकास, विजेच्या मूलभूत सुविधांचा विस्तार अशा अत्यावश्यक विषयांवर त्यांनी केलेल्या कामांचा शहराच्या विकासात मोलाचा वाटा आहे. त्याच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय आजही शहरात ‘टिकाऊ विकासाचे आदर्श’ म्हणून ओळखले जातात.

धारीवाल परिवार आणि वरिष्ठ नेते यांचे मार्गदर्शन विकासाला गती….

उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल तसेच माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अलकाताई खांडरे यांनी शहरात अनेक पायाभूत प्रकल्प राबवले. आंबेडकर उद्यान, नागरिकांसाठी सुविधावाढ, शहरातील लहान-मोठ्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद या सर्व गोष्टींसाठी त्यांचा विशेष पुढाकार नागरिकांनी कौतुकाने मान्य केला आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात अलकाताई खांडरे यांनी दाखवलेला सेवाभाव, मदतीसाठीची तत्परता आणि प्रशासनाशी समन्वय ही त्यांची खरी ओळख बनली. रुग्णांना तातडीची मदत, अन्नधान्य सहाय्य, मोफत आधार-रेशनकार्ड सेवा, अल्पदरातील अपघाती विमे, वैद्यकीय साहित्य उपलब्धता अशा उपक्रमांमुळे त्यांच्या सेवाभावी प्रतिमेला जनता विशेष मान देते. अलकाताईंच्या कार्यकाळात शहरातील शिक्षणव्यवस्था, आरोग्य सुविधा, रस्ते-विज-पाणी या मूलभूत गरजांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व शिरूरला मिळाले. नगरपरिषद प्रशासनात पारदर्शकता आणि कामकाजातील गती यांना त्यांनी दिलेले प्राधान्य हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. उमेदवारी जाहीर होताच विविध प्रभागांमधील दौऱ्यांमध्ये अलकाताईंना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार वर्ग या सर्व समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना अधिक बळकट होत आहे.“अनुभवी, स्वच्छ प्रतिमेची नेत्री पुन्हा नगराध्यक्ष झाल्यास शिरूरचा विकास अधिक वेगाने होईल” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराला नवी उंची…

महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अलकाताईंचा प्रचार अधिक संघटित, जोरदार आणि प्रभावीपणे राबवला जात आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली अलकाताईंच्या प्रचाराला आलेली गती आणि वातावरण पाहता आगामी निवडणुकीत त्या मोठी आघाडी घेतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नगरसेविका व उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी, कोरोना काळातील निस्वार्थ सेवा, विकासाभिमुख भूमिका आणि स्वच्छ राजकीय प्रतिमेमुळे अलकाताई खांडरे या नागरिकांच्या अपेक्षांची नैसर्गिक निवड बनल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे शिरूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

9 सेकंद ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

6 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

14 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

24 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

24 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

24 तास ago