सततची दादागिरी, सुडाचे राजकारण आणि अधिकार्यांवरील दबावामुळे जनतेचा संयम सुटला…
शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात टाकळीहाजीतील एका बड्या राजकीय गटाविरोधात असंतोष प्रंचड शिगेला पोहोचला असून आंबेगावातील देव माणूस असलेल्या नेत्याला खोटे सांगून तरुण व नागरिकांना पोलिसांकडून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे .गावोगावी तरुण आणि नागरिक आता होणाऱ्या त्रासामुळे उघडपणे विरोध व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सूडाच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. एकेकाळी निष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्तेही आता “पुरे झाले!” या भावनेने बाजूला होत आहेत.
टाकळीहाजी औटपोस्ट आणि शिरूर पोलीस ठाण्यात अस्वस्थता असून स्थानिक अधिकार्यांवर ‘खोटा गुन्हा दाखल करा’ असा दबाव टाकला जात असल्याची माहिती अत्यंत गंभीर आहे. टाकळीहाजी औटपोस्ट आणि शिरूर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर या बाबतची पडताळणी केली आहे.“तुम्ही आमच्या सांगण्याप्रमाणे नाही केले तर आंबेगावातल्या एका मोठ्या नेत्याचे नाव सांगून तुमची बदली करू.” अशी भाषा काही व्यक्ती अधिकार्यांकडे वापरत असल्याचे समजते. लोकप्रतिनिधींच्या नावाचा आधार घेऊन प्रशासनाला धमकावण्याचा प्रकार हा शिरूर–टाकळीहाजी पट्ट्यात प्रथमच इतक्या उघडपणे समोर येत आहे.
आंबेगावातील नेत्याला खोटी माहिती देऊन तरुण युवक, नागरिक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असून परिस्थिती मात्र वेगळीच असते वरिष्ठ, सर्वमान्य नेत्याचे नाव पुढे करून नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचेही बोलले जाते. प्रत्यक्षात तो नेता या प्रकरणांपासून दूर असल्याचे स्थानिक म्हणतात. मात्र त्याचे नाव वापरणारे काही जण ‘विश्वासार्हतेची ढाल’ बनवून दादागिरी व सुडाचा खेळ खेळत आहेत. टाकळीहाजीतील बड्या गटाच्या कारभाराचा चटका आधीच ग्रामपंचायत,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बसला आहे. स्थानिक मतदारांनी शांततेत आपला राग दाखवला. पण आता तरुण वर्ग उघडपणे बोलू लागला आहे.
एका तरुण कार्यकर्त्याने सांगितले की, आम्हाला दडपशाही नको. आम्हाला जाणूण बुजुण त्रास देण्याऱ्या लोकांना आम्ही पुन्हा सत्ता दाखवणार नाही. आम्ही धमकीला घाबरणारे नाही. या वेळेसही गणित नक्की बदलणार फक्त सूड! पण जनता बघत बसलेली नाही. निवडणुकीची पेटी आमचा बदला घेईल. बेट भागात पुन्हा ‘राजकीय भूकंप’ निश्चितअसून राजकीय विश्लेषकांचे मत स्पष्ट आहे की, बेट भागाची नाराजी ही फक्त भावनिक नाही… ती प्रत्यक्ष राजकीय असर निर्माण करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांना दडपशाहीतून बाहेर काढले गेले, ज्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, ज्यांच्यावर खोटे आरोप लावून पोलिसांकडून भीती दाखवली गेली तेच सर्व आता एकाच मंचावर येण्याच्या तयारीत दिसतात. गावोगावी बैठक, चर्चासत्रे, तरुणांचा वाढता प्रभाव आणि सोशल मीडियावरचा विरोध लक्षात घेता, या वेळेस टाकळीहाजीतील बड्या गटाला कडवी लढत आणि कडू अनुभव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जनता शांत आहे, पण गप्प नाही.
तरुण संतप्त आहेत, पण असंघटित नाहीत.
प्रशासन सावध आहे, कारण लोकत्रासापेक्षा ‘लोकशाहीचा शिस्तबद्ध रोष’ जास्त धोकादायक असतो.
बेट–टाकळीहाजी–शिरूर भागातील संपूर्ण राजकीय हवामान बदलण्याच्या मार्गावर आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नाराज मतदार कोणत्या बाजूला झुकतात यानेच सर्वांचे भविष्य ठरणार आहे.
(क्रमशः)
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…