मुख्य बातम्या

शिरुर; आधी मुरुम चोरी नंतर तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन दमदाटी

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा अन नऊ बारा… 

 

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असुन एका अट्टल मुरुम चोराने दि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्वी (ता. शिरुर) येथील एका अल्पसंख्याक समाजातील शेतकऱ्याच्या शेतातुन माती चोरली. या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केल्याने त्याच्या अंगावर चारचाकी घालत दहशत निर्माण केली. त्यानंतर शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्याच शेतकऱ्याच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी त्याच्यावर दवाब आणला.

हा सिनेस्टाईल प्रकार शिरुर तालुक्यात घडला असुन या सर्व प्रकार पाहिल्यानंतर आपण नक्की शिरुर तालुक्यात राहतोय की बिहार मध्ये असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत असुन या मातीचोरावर स्वतःच्याच गावात माती चोरल्या प्रकरणी आधीच एक गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे दुसरा गुन्हा दाखल होऊनही तपास अधिकारी फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत संशय निर्माण होत आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्वी (ता. शिरुर) येथे दि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५ च्या सुमारास एक अल्पसंख्याक समाजातील शेतकरी काही कामानिमित्त आपल्या शेतात गेला असता तिथे एक जेसीबी व दोन हायवाच्या साह्याने मुरुम चोरी सुरु होती. आपल्या शेतात मुरुम चोरी होत असल्याचे पाहताच संबंधित शेतकऱ्याने त्याला विरोध केला. त्यानंतर जेसीबी सह दोनही हायवा पळुन जाऊ लागल्याने शेतकऱ्याने हातातील काठी फेकुन मारल्याने एका हायवाची काच फुटली. पण तरीही त्यांनी पळ काढला.

त्यानंतर शेतकऱ्याने त्यांचा पाठलाग केला. यावेळी निर्वी गावच्या हद्दीतुन गुनाट फाट्यापासुन गुणवंतवाडी रस्त्याने सदर जेसीबी व दोन हायवाचा पाठलाग करत असताना निमोणेच्या हद्दीत न्हावरे-निमोणे रस्त्यावर जगताप वस्ती जवळ निमोणेच्या दिशेने हुंदाई कंपनीची क्रेटा कार क्रं एम एच १४ एफ जी ६८४९ हि गाडी जोरात शेतकऱ्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर सदर क्रेटा चालक पळुन गेला.

त्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्याने शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली. या घटनेचा तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले करत आहेत. परंतु आठ दिवसात तपास अधिकाऱ्यांनी काय तपास केला हा प्रश्न फिर्यादी विचारत आहेत. त्यानंतर काल (दि ३०) रोजी या मुजोर माती चोराने निर्वी येथे फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीसह त्याच्या ७५ वर्षीय वडीलांना माती चोरीची तक्रार मागे घ्या अन्यथा महागात पडेल असा दम दिला. त्यामुळे हे कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे.

चोराच्या उलट्या बोंबा अन पोलिसांच दुर्लक्ष…?

सदर मुरुम माफिया फिर्यादीला धाकावण्यापर्यंत मजल जात असेल तर शिरुर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था खरंच राहिलीय का…? एखाद्या अल्पसंख्याक कुटुंबावर अन्याय होत असताना तपास अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने का घेतलं नाही…? मुरुम चोरी करुन शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असताना प्रशासन गप्प का…? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करत आहेत. या मुरुम चोराकडुन या भागातील पोलिसांना मोठया प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ होत असल्यामुळेच त्याला पाठीशी घातले जात असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमशः) 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

10 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

14 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

20 तास ago

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…

20 तास ago

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…

20 तास ago

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…

21 तास ago