महाराष्ट्र

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी वसुलीसाठी समांतर यंत्रणा उभी केली आहे. “राज्यात १०० रुपये वसुली झाली तर ९० रुपये स्वतः घेतले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

चंद्रपूर येथील मोटर वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मार्फत झालेली कारवाई ही पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तक्रारदाराच्या प्रवासातील विसंगती आणि टोल नोंदीतील तफावत यावरून हे प्रकरण बनावट असल्याचे त्यांनी सूचित केले.

विदर्भातील ६४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींची मर्जी न झाल्याने त्यांच्या पदोन्नतीत अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, “जे अधिकारी वसुलीला नकार देतात त्यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवले जाते किंवा बदलीची धमकी दिली जाते,” असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

याशिवाय, अशोक खरात प्रकरण आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासाच्या कथित गैरवापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काही जण तंत्र-मंत्राचा आधार घेत सत्तास्थानी टिकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, “संविधानाची शपथ घेणाऱ्यांना हे शोभणारे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

पुणे जमीन घोटाळा असो किंवा आरटीओमधील वसुली प्रकरण—सरकार मोठ्या आरोपींना वाचवत असून केवळ लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “सरकारमध्ये अंतर्गत गटबाजी आणि गँगवॉर सुरू असून त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होत आहे,” असेही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago