महाराष्ट्र

सांगलीत ६५ वे राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यास मान्यता; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते.विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन यावर्षी प्रदर्शन सांगली जिल्ह्यात फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शासनमान्य अशासकीय 19 अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंत्रालयात पार पडली. कला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध मुद्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव संतोष खोरगडे तसेच अनुदानित कला महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील विद्यार्थी व कलाकार यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभा शक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कला संचालनालयाकडून दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. दरवर्षी राज्यात विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि कला संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात होते यावर्षी विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगली येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृती सांगलीकरांसाठी खुले असणार आहे. तर कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे 10 ते 16 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

राज्य कला प्रदर्शनांतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्कार व गौरव मानधनाच्या रकमेतील दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे कलाकार व विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यातील कला शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कला शिक्षणाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. राज्यात स्वतंत्र ललित कला विद्यापीठ स्थापन करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली होती. या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

5 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago