महाराष्ट्र

NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज

राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापीठांनी NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे,राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचवण्यासाठी आणि राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.

राज्यातील विद्यापीठांची NIRF तसेच जागतिक रँकिंगमध्ये उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, दर्जेदार शिक्षण देणे, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशने करणे, तसेच NAAC मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

2 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

24 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago