मुंबई: २१ वे शतक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे शतक मानले जाते. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) असून, ती शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवत आहे.
शिवसेना पक्षाचे मिडिया समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, “भारतासारख्या युवा लोकसंख्येच्या देशासाठी AI ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून राष्ट्रीय सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरू शकते.”
शिंदे यांच्या मते, भारतात सुमारे ६५% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, जी युवा पिढी नवकल्पक, तंत्रज्ञान-साक्षर आणि परिवर्तन स्वीकारण्यास तत्पर आहे. AI च्या माध्यमातून रोजगार, उद्योजकता, शिक्षण, आरोग्यसेवा, शेती आणि प्रशासन क्षेत्रात मोठे बदल घडवता येऊ शकतात.
ते पुढे म्हणाले, “AI आधारित प्रणाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतात, वैद्यकीय निदान जलद करतात आणि ऑनलाइन शिक्षण व स्मार्ट मूल्यांकनाद्वारे शिक्षण अधिक समावेशक व परिणामकारक बनवतात.”
AI च्या प्रगतीबरोबर काही आव्हानेही आहेत – रोजगार असुरक्षितता, डेटा गोपनीयता, तांत्रिक विषमता आणि नैतिक प्रश्न. यावर मात करण्यासाठी धोरणे, कौशल्य प्रशिक्षण आणि नैतिक चौकट गरजेची असल्याचे ते सांगतात.
शिंदे यांनी भविष्यासाठी मार्गदर्शन करत म्हणाले, “शालेय व उच्च शिक्षणात AI समावेश, युवा कौशल्य विकास, संशोधन व नवकल्पना प्रोत्साहन आणि मानव-केंद्रित AI या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.”
त्यांचे म्हणणे आहे की, “AI ही भारतासाठी केवळ संधी आहे; योग्य दिशेने प्रशिक्षित व सक्षम झालेली युवा पिढी याचा उपयोग करून देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या सशक्त बनवू शकते.”
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…