महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पक्षाची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत.

मान्यता रद्द करण्याचं कारण काय

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. तसेच त्यांच्या पक्षांचे कार्यालय कार्यालयांचे ठिकाण प्रत्यक्ष तपासणीत आयोगाला आढळून आलेले नाही, त्यामुळे त्यांनी या पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन आयोगाकडून जारी करण्यात आलं आहं.

खरं तर नोंदणीकृत पक्ष म्हणून राहण्यासाठी संबंधित पक्षाला निवडणूक लढवणे ही मुख्य अट आहे. 334 पक्षांनी 2019 पासून लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुका यापैकी कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या पक्षांची मान्यता रद्द

राज्यातील नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये आवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलान पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमॉक्रेटिक पार्टी, नवबहूजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डीयन, द लोक पार्टी ऑफ इंडिया, आणि युवा शक्ती संघटना या पक्षांचा समावेश आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

18 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago