महाराष्ट्र

बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही मार्गदर्शक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री आणि आमदारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचे स्मरण केले.

याबाबत बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे लोकनेते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले यशवंतराव चव्हाण यांनी समाजातील वंचित घटकांना अधिक अधिकार आणि संधी मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या विचारातून त्यांनी दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याचा ध्यास घेतला.

त्या पुढे म्हणाल्या की, राजकारणाबरोबरच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्राशीही यशवंतराव चव्हाण यांचा सातत्याने संवाद होता. ते कलारसिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पत्नी रेणूताई चव्हाण यांनाही वाचनाची विशेष आवड होती.

साताऱ्यातील ‘विरंगुळा’ हे त्यांचे निवासस्थान आज स्मृतीस्थान म्हणून जतन करण्यात आले असून तेथील समृद्ध ग्रंथसंपदा त्यांच्या वैचारिक परंपरेची साक्ष देते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर यशवंतराव चव्हाण यांचा ठसा आजही कायम असून विधानमंडळात त्यांना आदरांजली अर्पण करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago