महाराष्ट्र

महाविद्यालयीन शुल्कातील अनियमिततेची चौकशी; निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई: महाविद्यालयीन शुल्क निर्धारण प्रक्रियेत होत असलेल्या अनियमिततेच्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी विधानसभेत केली.सदस्य महेश शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला.

मंत्री पाटील म्हणाले की, Supreme Court of India च्या निर्णयानुसार राज्यात शुल्क निर्धारणासाठी फी रेग्युलेशन अथॉरिटी कार्यरत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने मागील वर्षाचे ऑडिट केलेले आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. समितीने मान्य केलेल्या खर्चाची एकूण रक्कम विद्यार्थ्यांच्या संख्येने भागून शुल्क निश्चित केले जाते आणि ते तीन वर्षांसाठी लागू राहते.

राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या शुल्काची जबाबदारी राज्य शासन उचलत आहे. मात्र काही महाविद्यालयांकडून प्राध्यापक नसतानाही त्यांचे वेतन दाखवणे, न झालेल्या बांधकामाचा खर्च दाखवणे किंवा इतर खर्च वाढवून दाखवून शुल्क वाढविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या प्रकरणात मोठा घोटाळा आढळल्यास विशेष तपास पथक नेमणे, एफआयआर दाखल करणे किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्याची कारवाई केली जाईल, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.तसेच या चौकशी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

45 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago