महाराष्ट्र

कॉपी करणाऱ्यांनो सावधान! परीक्षा केंद्रांवर नवे नियम लागू

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे.  विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल

राज्यातील सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने हे नवे धोरण अमलात आणले आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवरील निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे.

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह:

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत २० ते २६ जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताह m राबविण्यात येणार आहे.

सप्ताहातील मुख्य उपक्रम:

शपथविधी: शिक्षक-विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ

मार्गदर्शन वर्ग: परीक्षेतील तणाव कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले

कॉपीचे दुष्परिणाम: m शिक्षेबाबत जागरूकता

आरोग्य सल्ला: परीक्षा काळातील आहार आणि आरोग्याविषयी माहिती

जागृती रॅली आणि ग्रामसभा: विद्यार्थ्यांत आणि पालकांत जनजागृती

यंदाच्या परीक्षांसाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देईल. *”कॉपीमुक्त भारताच्या दिशेने एक पाऊल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

12 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

16 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

16 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

16 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

16 तास ago