महाराष्ट्र

अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पुण्यासारखा विकास होईल; धनंजय मुंडे

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत करत अजित दादांचे अभिनंदन केले असून अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याप्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेली सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आपणच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मला न करता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती केली होती, असेही धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये, याबाबतही आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती, त्यांनी ती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभारही धनंजय मुंडे यांनी मानले असून, आपल्यावर देण्यात आलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

2 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

4 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago