महाराष्ट्र

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही. यामुळे राज्यातील अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदारांची सुमारे ६२ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून ६ एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे २५० कोटी रुपयांचा QR कोड घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला जाब विचारला. कोणतीही कामे न करता QR कोडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाच्या निधीबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. विभागाच्या सोशल सिक्युरिटी वेलफेअरसाठी असलेल्या ४३४९ कोटी रुपयांपैकी तब्बल ३४१६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधा हिरावल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय सूडबुद्धीतून शैक्षणिक संस्थांवर कारवाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमी प्रकरणाचा उल्लेख केला. अशा कारवायांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, असा सवाल त्यांनी केला.

याशिवाय, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. नागपूर येथे १००० कोटी खर्चून नवीन विधानभवन उभारण्याच्या निर्णयावरून सरकारला वेगळा विदर्भ करायचा नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच सिमेंट उद्योगातील कामगारांची कमी मजुरी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील निकृष्ट कामांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago