नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, मांडणीची रणनीती आणि सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशासमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारा आर्थिक परिणाम, पुरवठा साखळीतील अडथळे आणि त्यावर केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी असेल.
दरम्यान, विरोधकांकडून उभे केले जात असलेल्या मुद्द्यांना ठामपणे उत्तर देत, “फेक नॅरेटिव्ह”चा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शिवसेना ही एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असल्याने केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देत जनहिताचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार खासदारांनी व्यक्त केला.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…