महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

मुंबई:राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. यामध्ये कोल्हापूरातील १७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाना भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे.

शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघाने विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटलंय की, शिष्यवृत्ती बंदच्या निर्णयाला विरोध आहे. ती पूर्ववत सुरू करावी. याबाबत १५ दिवसांत शासनाने बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी. असे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला.

सारथी संस्थेमार्फत आठवीमध्ये NMMS परीक्षेत उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जायची. त्यांना महिन्याला नऊशे रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जात होते. चार वर्षांसाठी हे पैसे मिळत होते. मात्र, ही शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले. यावेळी वसंतराव मुळीक, शैलेजा भोसले आदी उपस्थित होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन त्यांना त्रास होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता.आतपर्यंत शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ४० कोटींपर्यंत शिष्यवृत्ती देणे गरजेचे होते. मात्र, सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शासनाच्या या एकतर्फी निर्णयातून काय साध्य केले, असा प्रश्न मुळीक यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

2 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

16 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

16 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

22 तास ago