महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले की, ‘कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे’. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केली जाईल, असंही सरनाईक म्हणाले.

दरम्यान, सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, ‘अर्धा तासाने कामाला सुरूवात केली तर, सायंकाळी कामाचे तास वाढतील, एकूण कामाचे तास बदलणार नाही’, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसेच, ‘राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत’, असंही प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

गेल्या काही महिन्यांत लोकल रेल्वेच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा वाढत्या प्रकरणांवर उपाय म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच बैठक घेण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, सरनाईक यांनी, ‘कार्यालयीन वेळेत बदल करणे हा किरकोळ बदल जरी वाटत असला तरी, लाखो प्रवाशांना दैनंदिन प्रवासादरम्यान दिलासा मिळू शकतो’, असं सरनाईक म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

16 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago