महाराष्ट्र

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

औरंगाबाद: 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची परीक्षा ही दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार आज दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत.

www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळांनी इ.10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे

हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास?

प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे.

प्रवेश पत्र हरवल तर?

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळांनी पुन्हा ‘प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

54 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

58 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

1 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

1 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago