महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC मधील चुका दुरुस्त होणार; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन e-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत, e-KYC करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याबाबत दिलासा दिला आहे.

e-KYC करताना नेमकी अडचण काय झाली?

अदिती तटकरे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.”

मात्र, अनेक महिलांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला, तांत्रिक बाबींचे अज्ञान किंवा प्रणालीतील मर्यादांमुळे त्यांचे अर्ज अपूर्ण अथवा चुकीचे ठरले. परिणामी, जानेवारी महिन्यात काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही.

आता काय निर्णय घेण्यात आला आहे?

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अदिती तटकरेंनी स्पष्ट केले की,“e-KYC प्रक्रियेत चूक झालेल्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष (Physical Verification) करण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”यामुळे e-KYC मधील तांत्रिक चुका दुरुस्त होऊन पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुरुस्तीचा पर्यायच नव्हता, ही मोठी अडचण

महत्त्वाची बाब म्हणजे,

एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर

किंवा e-KYC पूर्ण झाल्यानंतर

पोर्टलवर कोणताही ‘Edit’ किंवा ‘Correction’चा पर्याय उपलब्ध नव्हता.

यामुळे अनेक महिलांचा अर्ज चुकीमुळे फेटाळला गेला आणि नियमित हप्ता मिळणाऱ्या महिलांचाही लाभ अचानक बंद झाला. याच कारणामुळे राज्यभरात काही ठिकाणी महिलांनी आंदोलनही केले.

महिलांना मोठा दिलासा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता चुकीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार असून, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

4 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago