महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये केशरी, पिवळे आणि पांढरे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानातून नियमित धान्य वितरित केले जाते. मात्र, यापैकी अनेक लाभार्थी हे शासकीय कर्मचारी असून त्यांची आर्थिक स्थिती सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ धान्य उचललेले नव्हते.

गेल्या काही वर्षांपासून आधार संलग्नता व बोटाचे ठसे (बायोमेट्रिक प्रणाली) वापरून धान्य वितरण होत असल्याने कोणत्या लाभार्थ्याने किती काळ धान्य घेतलेले नाही, याची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. याच माहितीच्या आधारे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र किंवा धान्य न घेणाऱ्या रेशनधारकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली.

या यादीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने २०,३१० रेशनधारकांचे धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापैकी कोणी पात्र लाभार्थी असल्याचा दावा करत पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यास, निकष तपासून त्यांच्या रेशनची सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्नसुरक्षा योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

14 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

18 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

18 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

18 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

18 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

19 तास ago