महाराष्ट्र

सोमवारी महाराष्ट्र बंद! सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात मोठा एल्गार

मुंबई: राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारच्या कर धोरणांविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने 14 जुलै 2025 बंद पुकारला आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की, सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील व्हॅट दुप्पट केला आहे. त्यामुळे ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. त्याचबरोबर परवाना शुल्कात 15% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे.

बार चालकांमध्ये नाराजी

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संघटनांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, ही करवाढ व्यवसायासाठी हानिकारक आहे, त्याचबरोबर लहान आणि मध्यम दर्जाच्या हॉटेल्स आणि बार चालवणे कठीण बनले आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्यांवर आणि लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अध्यक्षांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, सरकारचे कर धोरण अन्यायकारक आहे. आम्ही याबाबत प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली आहे, मात्र आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण राज्यावर परिणाम होणार

14 जुलै असणाऱ्या बंदचा परिणाम संपूर्ण राज्यावर होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये बंदचा परिणाम जाणवणार आहे. सोमवारी सर्व परमिट रूम, बार आणि मद्यपान विक्री करणारे हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. हा बंद शांततेत असणार आहे, मात्र जर सरकारने दखल घेतली नाही तर आगामी काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा बंद राजकीय चळवळ नसून आणच्या उद्योगाच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. आम्ही सरकारकडून न्याय्य कर धोरणाची मागणी करत आहोत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही संघटनेने म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

6 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago