महाराष्ट्र

अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; EPF आणि पेन्शनचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा निर्णय दिला असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निर्णयानुसार विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ९ हजार १५ कर्मचाऱ्यांना EPF आणि पेन्शन योजना लागू होणार आहे. आरोग्य, पोषण तसेच महिला-बालकल्याण क्षेत्रात अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सामाजिक सुरक्षा मिळत नव्हती.

निर्णयानुसार कर्मचारी आणि नियुक्ती करणाऱ्या आस्थापनांचे योगदान मिळून जवळपास १ हजार ८४ कोटी १३ लाख रुपये येत्या ६० दिवसांत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे.

अंगणवाडी आणि आशा कर्मचारी अनेक वर्षांपासून पूर्णवेळ कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करत असले तरी त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. सरकारी योजनांत काम करत असल्याने खासगी क्षेत्राचे नियम लागू होत नव्हते, तर कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे सरकारी PF चा लाभही मिळत नव्हता.

या प्रकरणात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) या कामगार संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. संघटनेचे अध्यक्ष अजित अभ्यंकर आणि सरचिटणीस वसंत पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे सादर केलेल्या मुद्द्यांवरून हा निर्णय देण्यात आला.पत्रकार परिषदेत आशा कर्मचारी संघटनेच्या किरण मोघे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम आणि उपाध्यक्ष रजनी पिसाळ उपस्थित होत्या.

दरम्यान, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना भविष्यात EPF आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago