महाराष्ट्र

कागदी मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही…

मुंबई: मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशिन्सबाबत नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे मात्र कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या वापरावर बंदी घातली आहे आणि कागदी (बॅलेट) पेपरचा वापर करून सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली. जगातील अनेक विकसित देशांनी ईव्हीएमच्या सत्यतेवर शंका घेऊन वापरावर बंदी घातली आहे याकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

भारतातल्या अनेक राजकीय पक्षांना तसेच वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनांना ईव्हीएम मशीनबाबत संशय आहे. त्याबाबतची चिंता अनेक वेळा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मोदी सरकारने या चिंतेचे अद्याप निराकरण केलेले नाही असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांनी ईव्हीएमच्या वापराशी संबंधित समस्यांबाबत प्रमुख विरोधी पक्षांची बैठक मागील काही दिवसाआधी बोलावली होती हे सांगतानाच जर भाजपला २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा एवढा विश्वास असेल तर त्यांनी नागरी समाज आणि राजकीय पक्षांच्या मनातील सर्व शंका दूर करून कागदी (बॅलेट) पेपरचा वापर करून मतदानाला सामोरे जावे असे आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे.

कागदी (बॅलेट) मतपत्रिकेवर मतदान झाल्यास कदाचित १५० चा आकडा पार करता येणार की नाही याचीच भीती भाजपला आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

1 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

1 दिवस ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून…

1 दिवस ago

पिंपळगाव पिसा येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त (दि 25) मे रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन

शिरुर (तेजस फडके) श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावात रेणुकामाता यात्रेनिमित्त दि 25 मे 2024 रोजी…

2 दिवस ago

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

4 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

5 दिवस ago