पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अवकाळी पाऊसात रस्त्याच्या कडेला पाऊसापासुन बचाव करण्यासाठी तसेच रस्त्यावरून प्रवास करताना अनेकवेळा वादळामुळे होल्डिंग पडुन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचा विषय ऐरणीवर आला आहे.

 

पुणे-सोलापूर महामार्गालगत (Pune-Solapur Highway) लोणी काळभोर येथील गुलमोहर लॉन्स येथे एक होर्डिंग कोसळले. त्यामध्ये बँड पथकातील एक घोडा जखमी झाला आहे. मुंबई येथील घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्याची बातमी ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchawad) शहरातही एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागामध्ये स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील २० बाय ४० फूट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. या दुर्घटनेमध्ये टेम्पो, कार तसेच पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर (Loni-Kalbhor) या ठिकाणी देखील एक होर्डिंग कोसळले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक घोडा जखमी झाला आहे. होर्डिंग शेजारी बँड पथक उभे होते, त्या बँड पथकावर पडल्यामुळे, बँड पथकाचे नुकसान झाले आणि घोडा गंभीर जखमी झाला आहे.

 

पुणे-सोलापूर हायवे लगत लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी होणारा खेळ तातडीने थांबणार का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळी वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे होर्डिंग कोसळल्यास जीवितहानी होण्याचा मोठा धोका आहे. या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

22 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago